काँग्रेसचा नगराध्यक्ष बसवावा लागला हेच आमदार वैभव नाईक यांचे अपयश.;माजी खासदार निलेश राणेंची टीका..

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ असतानासुद्धा काँग्रेसचा नगराध्यक्ष बसवावा लागला हेच आमदार वैभव नाईक यांचे अपयश आहे,अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी आज येथे केली. दरम्यान, नुकत्याच…

राणेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा उपनगराध्यक्ष.;मिताली सावंत यांची देवगड नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी निवड.

देवगड /- देवगड नगरपंचायत मध्ये उपनगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिताली राजेश सावंत यांची निवड झाली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रांतीक सदस्य निलेश गोवेकर…

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या साक्षी प्रभू तर,राष्ट्रवादीच्या मिताली सावंतांना उपनगराध्यक्ष पदी संधी.

देवगड /- देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या साक्षी प्रभु यांची निवड झाली आहे. तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मिताली सावंत यांना संधी देण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया आज पार पडली.

कसई दोडामार्ग नगराध्यक्षपदी मुळ भाजपचे चेतन चव्हाण यांची वर्णी.;तर उपनगराध्यक्ष देविदास गवस.

दोडामार्ग /- कसई-दोडामार्ग नगरपंचायतीवर अखेर मुळ भाजपाचे चेतन चव्हाण तर उपनगराध्यक्षपदी देविदास गवस विजयी झाले आहेत. त्या ठिकाणी निवडणुक रिंगणात असलेले राणे समर्थक गटाचे राजेश प्रसादी अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांना ही…

वाभवे-वैभववाडी नगराध्यक्षपदी भाजपाच्या नेहा माईणकर यांची निवड तर उपनगराध्यक्षपदी संजय सावंत.

वैभववाडी /- वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी भाजपाच्या नेहा माईणकर यांची वर्णी लागली आहे. तर उपनगराध्यक्षपदी संजय सावंत यांना संधी मिळाली आहे. ही निवड प्रक्रिया आज पार पडली. दरम्यान या निवडीनंतर भाजपाच्या…

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या आफ्रिन अब्बास करोल यांची निवड.

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे उमेदवार आफ्रिन अब्बास करोल यांची निवड झाली आहे.तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेचे मंदार शिरसाट यांची निवड झाली आहे.

कुडाळ दोडामार्ग वैभववाडी देवगड कोण होणार नगराध्यक्ष ?.;सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ नगरपंचायतींनवर आज होणार नगराध्यक्ष निवड.

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ,वैभववाडी, कसई-दोडामार्ग व देवगड जामसंडे या चार नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक आज सोमवारी दि.१४ फेब्रुवारीला होत आहे. आपलाच नगराध्यक्ष निवडून येणार असे म्हणून सर्वच पक्षांनी दंड थोपटले…

नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थीनींचा राजेश पडवळ चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सत्कार संपन्न.

वैभववाडी /- तालुक्यातील सन-२०२१-२२ च्या नवोदय विद्यालयाच्या प्रतिक्षा यादीत निवड झाल्याबद्दल कु.अक्षरा पंजीत बरगे व कु.दिया प्रकाश खरात या दोन्ही विद्यार्थीनींचा सत्कार समारंभ दत्त मंदिर वैभववाडी येथे संपन्न झाला. राजेश…

मळगाव ग्रामसचिवालयइमारत उदघाटना वरून शिवसेना आक्रमक.;आधी भ्रष्टाचारावर कारवाई करा नंतरच उदघाटन शिवसेनेची भूमिका.

सावंतवाडी /- मळगाव ग्रामपंचायतीमधील ग्रामनिधी तसेच १४ वित्त आयोगाच्या निधीतील भ्रष्टाचाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मळगाव नूतन ग्राम सचिवालयाचे उद्घाटन होऊ देणार नाही, असा इशारा ग्रामस्थ तसेच…

वेंगुर्ले पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी दुचाकी चोराच्या मुद्देमालासह 24 तासांत आवळल्या मुसक्या

वेंगुर्ला /- तालुक्यातील शिरोडा बागायतवाडी येथील राजेंद्र यशवंत नाईक (५७) यांची चोरीस गेलेली डिस्कवर टू व्हीलर गाडी वेंगुर्ले पोलिसांनी २४ तासात शोधून काढली. पोलिसांनी गाडीसह रोहित सुरेश नाईक (वय २७, रा.…

You cannot copy content of this page