अभिव्यक्ती हा माणसाचा स्थायी भाव आहे. भारतीय संविधानही आपल्याला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य प्रदान करते. अभिव्यक्तीची अनेक अंगे आहेत. मानवाच्या विकासाबरोबर ती अधिक व्यापक होत जाताहेत.

पूर्वी घनघोर अरण्यात एकलकोंडा राहणार माणूस समूहाने राहू लागला, हळूहळू तो समाजशील बनत गेला. या असंख्य लोकसमूहाचे प्रश्न त्याचे बनले, त्याचा प्रश्न या अखंड लोकसमूहाचा बनला. आणि मग या लोकसमूहात अनेक प्रश्नांच्या अनुषंगाने सामूहिक चर्चा घडू लागली, त्याचे साधक बाधक परिणामही दिसू लागले.

मात्र मित्रहो हा “लोकसंवाद” मानवी विकासाचा कधी केंद्रबिंदू होऊन गेला हे समजलं नाही. मानवतीळ संवाद अव्याहतपणे सुरु आहे. प्रांतांच्या भाषा वेगळ्या असतील, परंतु या संवादात भाषेच्या भिंतींचा अडथळा कधीच राहिला नाही. म्हणूनच हा “लोकसंवाद” आणखीन व्यापक होत गेला.

हि व्यापकता आणखीन वृद्धिगत करण्यासाठी आमचाही प्रयत्न आहे. आम्ही “लोकसंवाद” हे इंटरनेटच्या जगतातील एक वेबसाईटचे माध्यम आपल्या सेवेत घेऊन येत आहोत. वरती म्हटल्याप्रमाणे अभिव्यक्तीची अनेक अंगे आहेत या अनुषन्गाने वावरत असताना समाजात अनेक घंटाना घडत असतात, त्याची तटस्थपणे आपल्यासमोर मांडणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

यातून आमचा प्रामुख्याने एकच प्रयत्न राहणार आहे, तो म्हणजे या घटनांचे अवलोकन करताना त्यातील चांगल्या-वाईटाची समीक्षा होऊन समाजातील “लोकसंवाद” सक्षम व्हावा आणि आपली वैचारिक आदण प्रदानाची भाषा आणखीन सुदृढ व्हावी.

!! या नव्या जगाचे वाहक होताना आमच्यातही काही त्रुटी असू शकतात. त्याही संवादातून नाही लोकसंवादातून दूर करूयात !!

!! शांत, संयमी, मानवतावादी, समतावादी, स्त्रीदास्य विरहित समाजव्यवस्थेच्या रचनेसाठी नव्या संवादाची वीट रचूयात !!

!!!”लोकसंवाद” वृद्धिगत करूयात !!!