You are currently viewing नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थीनींचा राजेश पडवळ चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सत्कार संपन्न.

नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थीनींचा राजेश पडवळ चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सत्कार संपन्न.

वैभववाडी /-


तालुक्यातील सन-२०२१-२२ च्या नवोदय विद्यालयाच्या प्रतिक्षा यादीत निवड झाल्याबद्दल कु.अक्षरा पंजीत बरगे व कु.दिया प्रकाश खरात या दोन्ही विद्यार्थीनींचा सत्कार समारंभ दत्त मंदिर वैभववाडी येथे संपन्न झाला. राजेश मो.पडवळ चॅरीटेबल ट्रस्ट वैभववाडी यांच्या वतीने या विद्यार्थीनींनी मिळविलेल्या यशा बद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा असे मत ट्रस्ट चे अध्यक्ष राजेश पडवळ यांनी व्यक्त केले.

यावेळी वैद्यकीय कर्मचारी अशोक नारकर, शिक्षक संघटनेचे दिनकर केळकर,समीर कुलकर्णी ,शिक्षक नेते शरद नारकर, ट्रस्टचे अध्यक्ष राजेश पडवळ, उपाध्यक्ष प्रशांत गुळेकर, सचिव मंदार चोरगे त्याच बरोबर कैलास गोडसे, संतोष महाडिक, चंद्रकांत चव्हाण, आबा बर्गे, प्रकाश खरात व विद्यार्थी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..