सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ,वैभववाडी, कसई-दोडामार्ग व देवगड जामसंडे या चार नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक आज सोमवारी दि.१४ फेब्रुवारीला होत आहे. आपलाच नगराध्यक्ष निवडून येणार असे म्हणून सर्वच पक्षांनी दंड थोपटले आहेत मात्र वैभववाडी वगळता अन्य ठिकाणी यक्ष पदाधिकारी, नेते काय चमत्कार घडवून आणतात. हे प्रत्यक्ष नगराध्यक्ष निवडीवेळीच पाहायला मिळणार आहे.शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीकडून आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी अर्ज भरले असून त्याचा आज निकाल लागणार आहे.

देवगड नगरपंचायत मद्धे शिवसेनेच्या साक्षी गजानन प्रभू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर भारतीय जनता पक्षाच्या प्रणाली माने यांनी पक्षाकडून नगराध्यक्ष उमेदवारी भरली आहे.तर कुडाळ मधुन महाविकास आघाडी कडून आफ्रिन अब्बास करोल या काँगेस च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्यामुळे तर भाजप कडून प्राजक्ता बांदेकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.आणि भाजपचे सर्वच नेते मंडळी सांगत आहेत की नगराध्यक्ष हा भाजपचा बसणार त्यामुळे कुडाळ नगरपंचायत मद्धे नगराध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत चुरस निर्माण झाली आहे.याकडे संपूर्ण जिल्हा वासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

तर दोडामार्ग मद्धे भाजपचे चेतन चव्हाण आणि त्यांच्या समोर भाजपचे राजेश प्रसादी यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे,या दोन्ही मंडळींना भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळी कडून समझोता झालेला दिसत नाही आहे.त्यामुळे भाजपचा एक गट नाराज दिसत आहे.याचा फटका भाजपला बसेल का?हे सर्व चित्र आजच स्पस्ट होईल हे मात्र नक्की आहे.तर वैभववाडी नगराध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत भाजप आणि शिवसेने कडून दोन्ही पक्षांनी नगराध्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सानिका रावराणे यांनी शिवसेनेकडून तर नेहा माईणकर यांनी भाजपकडून नगराध्यक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रक्रियेत भाजप पक्ष व शिवसेना पक्ष काय खेळी केली आहे हे मात्र आज सोमवारी स्पस्ट होणार आहे.कोण मारणार बाजी ते चित्र आज नक्की स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page