वेंगुर्ला /-

तालुक्यातील शिरोडा बागायतवाडी येथील राजेंद्र यशवंत नाईक (५७) यांची चोरीस गेलेली डिस्कवर टू व्हीलर गाडी वेंगुर्ले पोलिसांनी २४ तासात शोधून काढली. पोलिसांनी गाडीसह रोहित सुरेश नाईक (वय २७, रा. गोवा वास्को द गामा) यास अटक केले असून असून अधिक तपास सुरू आहे.

बागायतवाडी येथील राजेंद्र नाईक यांनी कामावरून आल्यावर घराच्या पाठीमागे आपली बजाज डिस्कवर एम एच.-07-Y 4165 टू व्हीलर उभी करून ठेवली होती. निळ्या रंगाच्या रंगाची बजाज डिस्कवर सुमारे ३०,००० रुपये किमतीची ११ फेब्रुवारी रात्री १० ते १२ फेब्रुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कुणीतरी जागेवरून चोरून नेली. याची तक्रार वेंगुर्ला पोलीस स्थानकात श्री. नाईक यांनी सकाळी केली होती. त्यानुसार वेंगुर्ले पोलिस स्टेशनमध्ये भादवि कलम ३७९ अन्वये अज्ञात चोरट्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ सुरू करून वेंगुर्ले महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल कदम, पोहवा अजय नाईक, पोलीस नाईक योगेश राऊळ, सुरेश पाटील, अमर कांडर या पोलीस पथकाने २४ तासात या प्रकरणाचा छडा लावत अज्ञात चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. रोहित सुरेश नाईक (वय २७, रा. गोवा- वास्को द गामा) असे या गाडी चोरणाऱ्याचे नाव आहे. शहरात गाडीवरून जाताना तो दिसून आल्याने पोलिसांनी सदर टू-व्हीलर्स सह त्यास ताब्यात घेतले आहे. वेंगुर्ले पोलिसांच्या या धडक व तत्पर कारवाई बाबत जनतेतून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page