You are currently viewing हुंबरट येथे इनोव्हा कारची लक्झरीला धडक इनोव्हा कारमधील प्रवाशी गंभीर जखमी

हुंबरट येथे इनोव्हा कारची लक्झरीला धडक इनोव्हा कारमधील प्रवाशी गंभीर जखमी

कणकवली /-

कणकवली हुंबरठ येथे इनोव्हा कार व खाजगी बसचा आज सकाळी १० च्या दरम्यान अपघात झाला. अपघातात कारमधील तीन जण गंभीर तर पाच जणांना मोठी दुखापत झाली आहे. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही कार गोव्याच्या दिशेने जात असताना दुरुस्तीसाठी थांबलेल्या खाजगी बसवर धडकली असल्याची माहिती मिळाली आहे.

इनोव्हा कारमध्ये बहुतांशी महिला प्रवाशी होत्या. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. यावेळी स्थानिक रहिवासी नंदन पाटील यांच्यासह इतर जणांनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली. यावेळी वाहतूक पोलीस संदेश आबिटकर व सागर मासाळ हे उपस्थित होते.

अभिप्राय द्या..