You are currently viewing कणकवली शहरात पुन्हा आगीचे तांडव भंगार व्यावसायिक इंगळे यांचे भंगार सामान आगीच्या भक्ष्यस्थानी.

कणकवली शहरात पुन्हा आगीचे तांडव भंगार व्यावसायिक इंगळे यांचे भंगार सामान आगीच्या भक्ष्यस्थानी.

कणकवली /-

कणकवली शहरात पुन्हा एकदा आग लागून नुकसान झाल्याची घटना घडली आहे. कणकवली पंचायत समिती नजीक सर्विस रोडवरील भंगार व्यावसायिक इंगळे यांच्या भंगार समानाला शनिवारी रात्री 11.30 च्या दरम्यान अचानकपणे आग लागली. त्यामुळे एकच तारांबळ उडाली. मात्र तात्काळ कणकवली नगरपंचायतीचा अग्निशामक बंब दाखल होऊन आग विझवण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. परंतु या आगीत बहुतांशी भंगार सामानाचे नुकसान झाले. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली व नगरपंचायत बंब आल्याने आग आटोक्यात आली. यावेळी नगरपंचायत कर्मचारी गणेश लाड, समीर मोरे, मिथुन ठाणेकर, प्रकाश राठोड व स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा