You are currently viewing राणेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा उपनगराध्यक्ष.;मिताली सावंत यांची देवगड नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी निवड.

राणेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा उपनगराध्यक्ष.;मिताली सावंत यांची देवगड नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी निवड.

देवगड /-

देवगड नगरपंचायत मध्ये उपनगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिताली राजेश सावंत यांची निवड झाली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रांतीक सदस्य निलेश गोवेकर यांनी पुष्पहार देऊन अभिनंदन केले.

आमदार नितेश राणे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले यश हे विशेष आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना नेते संदेश पारकर, लोकसभा सहसंपर्क प्रमुख आप्पा पराडकर, राष्ट्रवादी काँग्रेस नेते नंदूशेठ घाटे, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष अविनाश चव्हाण, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, युवक शहर अध्यक्ष संदेश मयेकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..