Category: कणकवली

मनसे कणकवली उपतालुकाध्यक्ष प्रकाश उर्फ गुरु भालेकर यांचे निधन..

कणकवली /- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कणकवली उपतालुकाध्यक्ष प्रकाश शिवाजी उर्फ गुरु भालेकर (वय 50,रा. फोंडाघाट) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई ,पत्नी ,तीन मुलगे, काका ,काकी असा परिवार…

नडगिवेत ताबा सुटल्याने कंटेनर पलटी, चालक जखमी..

कणकवली /- मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटणपासून जवळ असलेल्या नडगीवे येथे सकाळी ९.३० वाजता एका अवघड वळणावर आयशर १६ चाकी कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात कंटेनर पलटी…

नरडवे मध्यम प्रकल्पासाठी १७५ कोटी मंजूर.;जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या पाठपुराव्याला यश..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली व देवगड तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्प अंतर्गत धरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने धरण प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे पत्र…

सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांची उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती.

कणकवली /- कणकवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुजित प्रकाश जाधव यांची उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत…

“संस्कृती प्रतिष्ठान मुंबईतर्फे कोकणच्या पुरग्रस्त गरजु जनतेसाठी केलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद”
-शिवसेना नेते सतिश सावंत यांचे गौरवोद्गार

खारेपाटण पुरग्रस्थांना संस्कृती प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने शिवसेनेच्या माध्यमातुन मोफत जिवनावश्यक वस्तुंचे वाटप.. कणकवली /- "आज कोकणवर महापुरामुळे नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे त्याने जनतेचे कधीही न भरुन येणारे असे नुकसान झाले…

आपत्तीग्रस्त जाधव कुटुंबियांना शासनाकडून चार लाखांची मदत…

कणकवली /- 23 जुलै च्या अतिवृष्टीत कणकवली तालुक्यातील दिगवळे रांजणवाडी येथील जाधव कुटुंबियांच्या घरावर दरड कोसळून प्रमिला जाधव यांचा मृत्यू झाला होता. तर पती प्रकाश जाधव हे गंभीर जखमी झाले…

कणकवली तालुक्यातील पूरग्रस्तासांठी राष्ट्रवादी आरोग्य मेळावा..

कणकवली /- कणकवली पीसेकामटे कातकरी वस्तीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व डॉक्टर्स सेल प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी कातकरी वस्तीत राष्ट्रवादी…

आशिये बायपाससाठी नगराध्यक्ष समिर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा पुढाकार..

कणकवलीतील पोस्ट खात्याच्या जमिन भूसंपादनाचा प्रस्ताव महिन्याभरात जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार सादर.. कणकवली /- कणकवली शहरातील आशिये बायपास रस्त्यासाठी आवश्यक असणारी पोस्ट खात्याच्या मालकीची सर्व जमीन भूसंपादनाने ताब्यात घेण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे,…

कलमठ येथील निवृत्त शिक्षक दत्तात्रय तेली यांचे निधन..

कणकवली /- कलमठ येथील रहिवासी दत्तात्रय महादेव तेली (वय 70) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे, चार बहिणी असा परिवार आहे. ते…

फडणवीस सरकारप्रमाणे पूरग्रस्तांना भरघोस मदत करा!.;भाजपाचे आमदार नितेश राणे यांची आघाडी सरकारकडे मागणी..

कणकवली /- देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१९ मध्ये पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्तांसाठी जशी भरघोस मदत केली होती तशीच मदत आघाडी सरकारने द्यावी , अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश…

You cannot copy content of this page