You are currently viewing डीवायएसपी पद्मजा चव्हाण यांना बलात्काराच्या गुन्ह्याच्या सर्वोत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर..

डीवायएसपी पद्मजा चव्हाण यांना बलात्काराच्या गुन्ह्याच्या सर्वोत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर..

कणकवली /-

कणकवली च्या तत्कालीन डीवायएसपी पद्मजा चव्हाण – बढे यांना पोक्सोसह बलात्काराच्या गुन्ह्याच्या सर्वोत्कृष्ट तपासासाठी केंद्र शासनाकडून दिले जाणारे केंद्रीयK गृहमंत्री पदक -2021 जाहीर झाले आहे. या यशाबद्दल सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी तसेच अंमलदाराना केंद्रीय गृहमंत्री पदक देऊन सन्मानित करण्यात येते. 2021 सालच्या या पदक यादीत पद्मजा चव्हाण – बढे यांना पदक जाहीर झाले आहे.

पद्मजा चव्हाण – बढे सध्या ठाणे शहर पोलीस सहाय्यक आयुक्तपदी कार्यरत आहेत. गुन्ह्याच्या पोलीस तापसामध्ये उत्कृष्ट प्राविण्य दाखविणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांच्या शिफारशी पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मागविण्यात आल्या होत्या. पद्मजा चव्हाण-बढे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात दाखल झालेल्या सीआर नं.33/2015 , भा. दं. वि.376 (2) (i) सह पोक्सो ऍक्ट कलम 4,6,8 नुसार दाखल गुन्ह्याचा यशस्वी तपास केला होता. या गुन्ह्यात आरोपीला जिल्हा विशेष न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली होती. आरोपीने हायकोर्टात केलेले अपील फेटाळत हायकोर्टानेही पद्मजा चव्हाण -बढे यांनी या गुन्ह्याचा केलेला तपास हा आयडिअल असल्याचा उल्लेख आपल्या निकालपत्रात केला होता. या गुन्ह्यात केलेल्या तपासकामाबद्दल पद्मजा चव्हाण -बढे यांची शिफारस केंद्रीय गृहमंत्री पदक साठी पोलीस महासंचालकांनी केली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 12 ऑगस्ट रोजी देशातील एकूण 152 पोलीस अधिकारी आणि अंमलदार याना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आले आहे. पद्मजा चव्हाण – बढे यांना केंद्रीय गृहमंत्री पदक – 2021 मिळाल्याबद्दल सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा