दोडामार्ग तालुक्यात तब्बल १२ लाखांचा गुटखा जप्त..

दोडामार्ग तालुक्यात तब्बल १२ लाखांचा गुटखा जप्त..

दोडामार्ग /-

मोरगाव येथे दोडामार्ग पोलिसांनी रात्री उशिरा मोठी कारवाई केली आहे. यात तब्बल बारा लाख रुपये किमतीचा गुटखा आणी बॉलेरो पिकअप जप्त करण्यात आली आहे.याप्रकरणी वाफोली येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई मोरगाव येथे करण्यात आली. गोपाळ राजाराम गवस असे त्याचे नाव आहे. याबाबतची माहिती दोडामार्ग पोलिसांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक रिझवाना नदाफ यांनी दिली. त्या म्हणाल्या, आम्हाला पक्की माहिती मिळाली होती. त्यानुसार मोरगाव येथे आम्ही सापळा रचला. यावेळी आपले सहकारी मनीष शिंदे, दीपक सुतार, अजय गवस, पाटील यांनी सहकार्य केले. त्या वेळी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संबंधित व्यक्ती गाडी संशयास्पदरीत्या घेऊन जात असताना आढळून आला. त्याला दाबून गाडीची तपासणी केली असता गाडीत तब्बल बारा लाखाचा मुद्देमाल मिळाला आहे. संबंधित सावंतवाडीकडे हा माल घेऊन जात होता तशी त्याने कबुली दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी हे प्रकरण अन्नभेसळ विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..