विजयदुर्ग पुणे एसटी बसला कापूरहोळ येथे अपघात..

विजयदुर्ग पुणे एसटी बसला कापूरहोळ येथे अपघात..

देवगड /-

पुणे शहरापासून सुमारे २५ की. मी. अंतरावर असलेल्या कापूरहोळ या गावानजीक रस्त्यावरील माती व रिमझिम पाऊस सुरु असताना ब्रेक मारल्यानंतर विजयदुर्ग आगाराची विजयदुर्ग-पुणे ही प्रवासी फेरी एसटी घसरून नजीकच्या सखल भागात गेली. या अपघातात दोन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. घटनास्थळी रापम पुणे विभागाचे अधिकारी दाखल होऊन क्रेनच्या सहाय्याने एसटी बाहेर काढण्यात आली आहे. हा अपघात गुरुवारी साय. ४ च्या सुमारास कापूरहोळ गावानजीक घडला.

अभिप्राय द्या..