You are currently viewing भूविकास बँक अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्यांसंदर्भात १८ रोजी मुंबईत बैठक..

भूविकास बँक अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्यांसंदर्भात १८ रोजी मुंबईत बैठक..

कुडाळ /-

राज्यातील भूविकास बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व त्यांचे इतर प्रश्न मार्गी लावण्याची मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवदेनाद्वारे केली होती. राज्यातील इतर विधानसभा सदस्यांनी व संबंधित व्यक्तींनी देखील याबाबतची मागणी केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने राज्यातील भूविकास बँक अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्यांसंदर्भातील बैठक बुधवार १८ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १०:४५ वा. सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे आयोजित केली आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..