युवा फोरम संस्थेतर्फे २१ ते २७ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन..

युवा फोरम संस्थेतर्फे २१ ते २७ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन..

कणकवली /-

राज्यभरात सर्व स्वयंसेवकांच्या सहयोगाने युवा फोरम संस्थेच्यावतीने मुंबई शहरात वॉल ग्राफिटी , सोलापूर येथे स्वच्छता मोहीम , रत्नागिरी येथे माणुसकीची भिंत असे राज्यभरात बऱ्याच प्रकारचे सामाजिक कार्यक्रम २१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट या दरम्यान हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत . तसेच सिंधुदुर्ग जिल्हा हे या संस्थेचा उगमस्थान व इथेच पाया रचलेला असल्यामुळे जिल्हाभरात विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत . युवा फोरम भारत संस्था ही 4 वर्षात पदार्पण करत आहे . त्या निमित्ताने संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे , उपाध्यक्ष अमोल निकम , सचिव अॅड.हितेश कुडाळकर , सह सचिव अश्विनी जोशी , संपर्क प्रमुख पूजा खानोलकर , महिला प्रतिनिधी सिद्धी सावंत , खजिनदार गणेश सावंत , सह खजिनदार संकेत राणे , कार्यालय प्रमुख भूषण मेस्त्री या शिष्टमंडळाच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्त्वाखाली राज्यभरात सर्व स्वयंसेवकांच्या सहयोगाने युवा फोरम संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत . ज्यांना कोणाला आम्हाला या कामात हातभार लावायचा असेल त्यांनी आमच्या संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधावा .असे आवाहन युवा फोरम संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..