सत्ताधारी करू शकले नाहीत ते काम भाजपच्या विचारांचा आमदार म्हणून करूशकलो याचे समाधान.;<br>आमदार नितेश राणे

सत्ताधारी करू शकले नाहीत ते काम भाजपच्या विचारांचा आमदार म्हणून करूशकलो याचे समाधान.;
आमदार नितेश राणे

विरोधीपक्षनेते फडणवीस यांच्या उपस्थितीत मतदारसंघातील सर्व १६९ सरपंचना दिले विमा संरक्षण..

कणकवली /-“सेवा हेच संघटन” हे आमचे ब्रीद आहे.
रायगड पासून सिंधुदुर्ग पर्यत मी भाजपा पक्षाचा एकमेव आमदार आहे.जे काम सत्ताधारी करू शकले नाही ते काम मी भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा आमदार म्हणून करू शकलो. याचे समाधान आहे.भविष्यात विविध सेवा कार्य पुढील काळात भाजपा च्या माध्यमातून करत राहणार असे अभिवचन भाजपाचे कणकवली, देवगड, वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांनी दिले.
आपल्या मतदारसंघातील सर्व १६९ सरपंचाना आमदार नितेश राणे यांनी ३ लाखाच्या आरोग्य विम्यासह ७ लाख ५० हजारापर्यत मोबदला देणारी आरोग्य विमा संरक्षण उतरली त्याचे वितरण प्रहार भवन येथे झाले त्यावेळी ते बोलत होते.
आम.नितेश राणे म्हणाले,कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्य सरकारची मदत नसतांना गावाच्या सुरक्षेसाठी सरपंच लढत आहेत. त्या सरपंचना विमा कवच देत असतांना मला समाधान वाटते.
सरपंचांनी वारंवार विंनती केली मात्र राज्य सरकार कडून कोणतीही मदत नाही.भरणी सरपंच असलेल्या आमच्या महिला भगिणीचे अशाच पद्धतीने जनसेवा करताना कोरोना विरुद्ध च्या लढ्यात निधन झाले.
गावात आलेला प्रत्येक माणूस पहिला येऊन सरपंचना भेटतो मात्र त्याला कुठचे संरक्षण दिले जात नाही.सत्ताधारी आणि पालकमंत्री वारंवार सांगित होते की सरकारने विमा कवच दिले नाही तर स्वतः देणार म्हणून,आता कुठे आहेत हे लोक ?असा सवालही केला.
सरपंचाना राज्य सरकारने सुरक्षितता द्यावी ही माफक अपेक्षा होती मात्र कोरोनाच्या दोन्ही लाटेत मुख्यमंत्री फेसबुकवर यायचे तेव्हा कोरोना योद्धा बोलून शाब्दिक कैतुक करायचे मात्र कृतीतून या सरपंचाना आधार देण्याचे कुठलेही ठोस काम केलेले नाही.आता तिसऱ्या लाटेची चर्चा होते आहे, डेल्टा चा एक बळी सुद्धा गेला आहे.
महाराष्ट्र सरकार कुठे कमी पडत असेल तेथे भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून “सेवा हेच संघटन” हे आमचे ब्रीद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी च्या नेतूत्वाखाली आज कार्यक्रम घेऊन कणकवली,देवगड,वैभववाडी मतदार संघातील १६९ सरपंचाचे एक वर्षाचे आरोग्य विमे उतरले आहेत.कोरणाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जात असताना सुरक्षित भावनेतून हे सरपंच जातील कारण सारपंचनाही कुटुंब असतात त्यामुळे निर्भीड पणे कोरोनाशी लढण्यासाठी या सर्व सरपंचाची काळजी आम्ही आमच्या माध्यमातून घेतली असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..