होय .!आमदार नितेश राणेच आमचे आरोग्य दूत.;सरपंच संतोष किंजवडेकर

होय .!आमदार नितेश राणेच आमचे आरोग्य दूत.;सरपंच संतोष किंजवडेकर


आम.नितेश राणे यांनी सरपंचाना स्वखर्चाने दिलेल्या विमा संरक्षण पॉलिसी वितरण कार्यक्रम संपन्न.

कणकवली /-


भाजपा आम.नितेश राणे यांनी मतदारसंघातील प्रत्येक सरपंचाना स्वखर्चाने विमा उतरून खऱ्या अर्थाने सरपंचांना आधार देण्याचे काम केले आहे.कोरोनाचा कठीण काळात सरपंचांच्या पाठीशी ना सरकार राहिले ना पालकमंत्री अशा वेळी फक्त नितेश राणेंच मदतीला धावले. आमच्या आरोग्याची, जीविताची काळजी विमा पॉलिसी काडून संरक्षण दिले.आमदार नितेश राणे हेच आमचे खरे आरोग्य दूत आहेत अशा शब्दांत सरपंच आणि भाजपा देवगड तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी ऋण व्यक्त केले.
प्रस्थाविक सरपंच संतोष किंजवडेकर यांनी केले ,ते म्हणाले आमदार नितेश राणे म्हणजे मतदारसंघाचे पालक आहेत.थेट सरपंचाशी संपर्कात राहून विकासाचा मागोवा घेणारे आमदार आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. कोविड काळात सरपंचांना धीर देण्याचे काम आमदार नितेश राणे यांनी केली.आमदार नितेश राणे हे खरे आरोग्य दूत म्हणून आहेत. असे संतोष किंजवडेकर यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर आमदार नितेश राणे यांच्या समवेत जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.संजना सावंत,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, सभापती मनोज रावराणे,सौ.अक्षता डाफळे, रवींद्र पाळेकर, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे,तालुका अध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री,संतोष किंजवडेकर,डॉ.अमोल तेली,सरपंच संघटना अध्यक्ष संतोष राणे, आदी उपस्थितीत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी आमदार नितेश राणे यांनी किती बारकाईने ही विमा पॉलिसी निवडली आहे हे सांगितले.उपस्थितांचे आभार अरविंद रावराणे यांनी मानले.

अभिप्राय द्या..