You are currently viewing शिरोडा गावचे सरपंच व ग्रामसेवक यांना निलंबित करा.;उपसभापती श्री.सिद्धेश उर्फ भाई परब

शिरोडा गावचे सरपंच व ग्रामसेवक यांना निलंबित करा.;उपसभापती श्री.सिद्धेश उर्फ भाई परब

वेंगुर्ला /-

शिरोडा बर्थडे पार्टी प्रकरण एक वर्ष पूर्ण झाले आणि पुन्हा सरपंच ग्रामसेवक यांचा सिद्धेश परब यांनी पर्दाफाश केला आहे,जाणून बुजून ग्रामस्थांचा छळ करत असल्याचा केला आरोप केला आहे.शिरोडा सरपंच आणि ग्रामसेवक यांनी शासनाचा दोन वर्षाचा महसूल बुडवला या संदर्भात यांच्यावर कारवाई करून यांना निलंबित करावे असा ठराव वेंगुर्ला पंचायत समितीच्या ऑनलाईन झालेल्या मासिक सभेमध्ये मा.उपसभापती श्री सिद्धेश परब यांनी मांडला.

शिरोडा येथील रहिवासी श्री निरंजन बाळकृष्ण मठकर, यांनी 2019 मध्ये नवीन घर बांधले व घर बांधल्यानंतर शिरोडा ग्रामपंचायतीकडे अर्ज करून सदर घरला अनधिकृत संबोधून घर नंबर द्यावा व आपला कर वसूल करून घ्यावा अशी विनंती लेखी अर्जाद्वारे केली .मात्र दोन वर्ष उलटून गेली तरी शिरोडा ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक हे जाणून बुजून घर नंबर देण्यास टाळ टाळ करत आहेत. शासन नियम व परिपत्रकानुसार ग्रामपंचायत हद्दीत एखाद्या जागी बिगर परवाना बांधकाम केले असेल तर त्याची अनाधिकृत संबोधून कर वसुली करण्यात यावी असे 18 जुलै 2016 चे परिपत्रक आहे.

श्री निरंजन मठकर यांनी वेंगुर्ला पंचायत समिती यांना निवेदन दिले होते व त्यांना 15 ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे सांगितले. त्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

आज झालेल्या पंचायत समितीच्या ऑनलाईन मासिक सभेत मध्ये मा. उपसभापती सिद्धेश परब यांनी शिरोडा गावच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांनी दोन वर्षाचा शासनाचा महसूल बुडवल्या संदर्भात या दोघांना निलंबित करण्यात यावे असा ठराव मांडला व शिरोडा येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक श्री निरंजन बाळकृष्ण मठकर यांना लवकरात लवकर घर नंबर देण्यात यावा व घरपट्टी वसूल करण्यात यावी असे श्री परब यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..