जि.प.आरोग्य विभागाच्या ४३ जणांना स्वातंत्र्यदिनी ‘कोव्हीड योद्धा ‘म्हणून गौरविणार..!

जि.प.आरोग्य विभागाच्या ४३ जणांना स्वातंत्र्यदिनी ‘कोव्हीड योद्धा ‘म्हणून गौरविणार..!

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी,परिचारिका ,परिचर आदी ४३ जणांना येत्या स्वातंत्र्य दिनी ‘कोव्हीड योद्धा’ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.यापैकी पाच जणांचा जिल्हा स्तरावर ध्वजारोहणानंतर ,जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.तर उर्वरीत डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचा तालुका स्तरावर, तहसिल कार्यालयात  प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

शासन निर्णयानुसार हा उपक्रम राबविण्यात येणार असून या  ४३ जणांमध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे  वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सहाय्यक,सहाय्यीका, आरोग्य सेवक,सेविका,सफाई कामगार,आरोग्य कर्मचारी,परिचर,स्त्री परिचर,वाहन चालक आदींचा समावेश आहे.

जिल्हा आरोग्य विभागाने ही यादी तयार केली असून यामध्ये अहोरात्र सेवा बजावणाऱ्या एकाही औषध निर्मात्याचा समावेश करण्यात आलेला नाही.आरोग्य विभागाने जिल्ह्यातील या निवडक ४३ जणांची यादी तयार करतांना कोणते निकष लावले याची माहिती मिळू शकलेली नाही.

अभिप्राय द्या..