एक्साईज कर्मचाऱ्याने केली मारहाण केल्याने मळगावातील अजित कांबळी यांची पोलिस ठाण्यात तक्रार..

एक्साईज कर्मचाऱ्याने केली मारहाण केल्याने मळगावातील अजित कांबळी यांची पोलिस ठाण्यात तक्रार..

सावंतवाडी /-

एक्साईज कर्मचाऱ्याने आपल्याला येवून मारहाण केली.तसेच आपल्या सोबत चल, अन्यथा तुला गांज्यांच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली, अशी तक्रार मळगावातील एकाने आज येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना ८ ऑगस्टला घडली. अजित मधुकर कांबळी, असे त्याचे नाव आहे. दरम्यान त्याने दिलेल्या तक्रारीनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र नेमका प्रकार काय घडला, कोणत्या कारणावरुन घडला, याचा शोध घेण्यात येणार आहे, असे पोलिस निरिक्षक सचिन हुंदळेकर यांनी सांगितले.याबाबत कांबळी याने दिलेल्या तक्रारीत असे म्हटल आहे की, ८ तारखेला सायंकाळी ४ वाजता आपल्याला एका व्यक्तीचा फोन आला, आणि त्याने मला घरातून झाराप पत्रादेवी महामार्गावर बोलविले. त्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणावरून पांढऱ्या कार मधून आलेल्या एका कर्मचाऱ्याने उद्या १२ वाजेपर्यत तुला कोर्टात हजर व्हायचे आहे. तु उपस्थित न राहिल्यास तुझ्यासह तुझ्या बायको-मुलांना गांजा किंवा दारुच्या प्रकरणात अडकवेन,असे सांगुन हाताच्या थापटाने मारहाण केली, असे त्याने तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत श्री. हुंदळेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा दिला आहे. हा प्रकार अदखलपात्र गुन्ह्यात मोडतो. त्यामुळे त्याची चौकशी करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..