You are currently viewing फोंडाघाट येथील रहिवासी एसटी चालक सुहास हावुळ यांचे निधन..

फोंडाघाट येथील रहिवासी एसटी चालक सुहास हावुळ यांचे निधन..

कणकवली /-

फोंडाघाट महात्मा गांधी चौक येथील ग्रामस्थ, सुहास शंकर हावुळ (५१ वर्ष) यांचे मूत्राशयाचा दुर्धर आजाराने घरी दुःखद निधन झाले. ते कणकवली येथे एस.टी. विभागात चालक म्हणून कामास होते. चौकातील विविध उपक्रमात त्यांचा सहभाग होता. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच, एस. टी. चे डेपो मॅनेजर प्रमोद यादव, वाहतूक नियंत्रक निलेश लाड, स्थानक प्रमुख एस. टी. पवार आणि बाळा गोसावी, महेश भोगटे, सदू नांदोसकर या सहकाऱ्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. एसटीच्या सेवेत कार्यरत असलेल्या सुहास यांचे पश्चात त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. त्याचे पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार असून येथील नामवंत टेलर डिगी हावुळ यांचे ते बंधू होत. त्यांच्या अकाली निधनाने परिसरामध्ये दुःख व्यक्त होत आहे.

अभिप्राय द्या..