गाबीत समाज इतिहास आणि जाती सर्वेक्षणवेळी माहीतीसाठी पुरावे व संदर्भ पुस्तक तयार करणार..

गाबीत समाज इतिहास आणि जाती सर्वेक्षणवेळी माहीतीसाठी पुरावे व संदर्भ पुस्तक तयार करणार..

माहिती पाठविण्याचे चंद्रशेखर उपरकर यांचे आवाहन..

कणकवली /-

अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ,मुंबई तर्फे महाराष्ट्र,गोवा व कर्नाटक राज्यातील संपूर्ण गाबीत समाजाचा इतिहास भावी पीढिपुढे यावा आणि जातींच्या सर्वेक्षणाच्या वेळी शासनास पुरावे व संदर्भ म्हणूनही उपयुक्त ठारावी असे माहितीपूर्ण पुस्तक तयार करण्याचे काम चालू असून त्यासाठी माहिती पाठविन्याचे आवाहन अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे संघटक चंद्रशेखर उपरकर यानी केले आहे. सदरील माहिती पाठविताना इतिहासकालिन काळात ज्या गाबीत लढवय्यानी लढे दिले आहेत,शिवकालीन आरमारात काम केले असेल त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमि कळ वावी. स्वातंत्र्य काळात ज्यानी समाजकार्य केले आहे व गाबीत समाजासाठी कार्य केले आहे अशा समाज बांधवांची माहिती पाठवावी. त सेच आपल्या गाबीत व मच्छीमार वस्तीतील,गावातील, कुटुंबातील परंपरान्तर्गत चालत आलेल्या विशेष रूढ़ी परंपरा, चालिरिती,सण,आणि पूर्वीचे व सध्याचे राहणीमान यांची माहिती लेखी अथवा ईमेल द्वारे पाठवावी. आपल्या घराण्याविषयी परम्परान्तर्गत असलेली नावे, थोरवी या संबधी तसेच गाबीत समाजातील पारंपरिक चालत आलेल्या व विशेष पद्धतीने केल्या जाणाऱ्या मासेमारी बाबत माहिती पाठवावी. काही किनारपट्टिच्या गावामध्ये, किल्ल्यामध्ये, देवालयातून असलेले गाबितांचे वतनदारी हक्क, मानपान अजूनही चालत असल्यास त्याचीही माहिती पाठवावी. गाबीत समाजासाठी सामाजिक कार्य केलेले पुढारी, लेखक, कवि, कवयित्री, शिक्षणमहर्षि, संत परंपरा लाभलेले साधुपुरुष, तसेच जुन्या काळात गलबते, तारू असलेले मछिमारीतील उद्योगपति, सध्यस्थितीत देश-विदेशात असलेले उद्योगपति, सनदी अधिकारी यांचीही माहिती देण्यात यावी. हि माहिती दिनांक 31 ऑगष्ट 2021पूर्वी श्री. चंद्रशेखर उपरकर मु.पो.ता. कणकवली (तेलीआळी)या पत्त्यावर किंवा chandrashekharuparkar@gmail.com या वेबसाईट वर पाठविण्यात यावी. असे आवाहन करण्यात आले आहे

अभिप्राय द्या..