महिला दिनानिमित्त शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार

महिला दिनानिमित्त शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार

कणकवली /-

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन शिवसेना महिला आघाडीच्या सौ.प्रतिक्षा साटम, यामिनी साटम, अनुराधा साटम, प्रेरणा साटम, संजना देवळेकर, साक्षी साटम, मिनल साटम, रिद्धी साटम यांच्या हस्ते शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
“कोरोनाच्या संकटात देखील न घाबरता जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सर्व महिला तसेच पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य निर्भीडपणे पार पाडले. जिल्ह्यात कोरोना फैलावत असतानाही न घाबरता कर्तव्यनिष्ठ राहणाऱ्या महिलांचा सन्मान करुन त्यांच्या या कौतुकास्पद कार्याची दखल घेणे गरजेचे होते. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने हा सत्कार करण्यात आला असुन कर्मचाऱ्यांच्या सदैव पाठीशी राहणार,” असे यावेळी सौ.प्रतिक्षा साटम यांनी उपस्थित महिलांना सांगितले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी कोठूरवार, ज्येष्ठ आरोग्यसेविका गिता देसाई, आरोग्य सहाय्यीका आर.आर. आरोलकर, आर.आर.नार्वेकर, आर.ए.लाड, आरोग्यसेविका बी.एस.राणे, एस.आर.तावडे, ए.के.इंदप, एच.व्ही.मोर्ये, एम.एफ.राठोड, समृद्धी कुशे आदींचा सत्कार करण्यात आला. या सत्काराने भारावून वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी कोठुरवार आणि सर्व महिला कर्मचाऱ्यांनी शिवसेना महिला आघाडीचे आभार मानले. या सत्कार सोहळ्याचे देवगड शिवसेना तालुकाप्रमुख श्री.मिलिंद साटम यांनी विशेष कौतुक केले.

अभिप्राय द्या..