दोडामार्ग तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुहास देसाई यांची निवड..

दोडामार्ग तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुहास देसाई यांची निवड..

दोडामार्ग /-

दोडामार्ग येथील तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुहास देसाई,तर सचिव पदी महेश लोंढे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा कार्यकारिणीवर संदीप देसाई यांना पाठविण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा
पत्रकार संघाच्या दोडामार्ग तालुका कार्यकारिणीच्या निवडीसाठीची बैठक
आज येथे मावळते अध्यक्ष प्रभाकर धुरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी निरीक्षक म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष संतोष सावंत, सहसचिव देवयानी वरसकर उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष म्हणून साबाजी सावंत व भिकाजी गवस, कोषाध्यक्ष ऋषिकेश धर्णे, सहसचिव गजानन बोंद्रे, पत्रकार शंकर जाधव, वैभव साळकर, रत्नदीप गवस, तेजस देसाई, संदेश देसाई, प्रभाकर धुरी, लखु खरवत, गणपत डांगी, राजेश देसाई, सुनील नांगरे, समीर ठाकूर, ओम देसाई आदींची निवड करण्यात आली.

अभिप्राय द्या..