मालवण तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी संतोष गावडे.;उपाध्यक्षपदी दत्तप्रसाद पेडणेकर अर्जुन बापर्डेकर तर सचिवपदी कृष्णा ढोलम यांची निवड..

मालवण तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी संतोष गावडे.;उपाध्यक्षपदी दत्तप्रसाद पेडणेकर अर्जुन बापर्डेकर तर सचिवपदी कृष्णा ढोलम यांची निवड..

मालवण /-

मालवण तालुका पत्रकार समितीच्या सन २०२१-२०२३ या दोन वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून चौके गावचे पत्रकार संतोष गावडे यांची तर सेक्रेटरी म्हणून पत्रकार कृष्णा ढोलम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

मालवण तालुका पत्रकार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा मालवण येथील हॉटेल स्वरा येथे मालवण पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा पत्रकार संघाचे सचिव श्री. उमेश तोरसकर व जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळ खडपकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर मराठी पत्रकार परिषद कोकण विभागीय संघटक नंदकिशोर महाजन, जिल्हा सदस्य विद्याधर केनवडेकर, तालुका सचिव प्रशांत हिंदळेकर, खजिनदार कृष्णा ढोलम, उपाध्यक्ष अमित खोत, उपाध्यक्ष संतोष हिवाळेकर आदी व इतर उपस्थित होते. ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. प्रारंभी तालुका अध्यक्ष प्रफुल्ल देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत करून अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत केलेल्या कार्याचा आढावा घेतला तर प्रशांत हिंदळेकर यांनी जिल्हा पत्रकार संघाकडून आलेल्या पत्रांचे वाचन केले. या बैठकीत सन २०२१ ते २०२३ या दोन वर्षाच्या कालावधीसाठी मालवण तालुका पत्रकार समितीची कार्यकारणी निवडण्याचा आली ती पुढील प्रमाणे अध्यक्ष संतोष गावडे, उपाध्यक्ष अर्जुन बापार्डेकर, दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम, सहसचिव परेश सावंत, खजिनदार सिद्धेश आचरेकर, सदस्य अमित खोत, अमोल गोसावी, विशाल वाईरकर, सुरेश घाडीगांवकर, अनिल तोंडवळकर, मंगेश नलावडे, निमंत्रित विद्याधर केनवडेकर, कुणाल मांजरेकर, प्रफुल्ल देसाई.

या बैठकीत मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई आणि त्यांच्या कार्यकारणीने गेल्या अडीच वर्षात केलेल्या कार्याबद्दल तसेच मालवण तालुका पत्रकार समितीच्या क्रिकेट संघाने मिळविलेल्या यशाबद्दल अभिनंदनाचे ठराव संमत करण्यात आले तसेच पत्रकार कृष्णा ढोलम यांच्या आई सौ अनिता ढोलम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नूतन अध्यक्ष संतोष गावडे आणि त्यांच्या कार्यकारणीचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी श्री. संतोष गावडे यांनी नजीकच्या दोन वर्षाच्या कालावधीत आपण समाजाभिमुख तसेच पत्रकारांच्या हिताचे कार्यक्रम राबवू अशी ग्वाही दिली. यावेळी उमेश तोरसकर, बाळ खडपकर, किशोर महाजन, अमित खोत यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी महेश सरनाईक, नितीन गावडे, विशाल वाईरकर, अर्जुन बापर्डेकर, सौगंधराज बादेकर, सुरेश ठाकूर, महेश कदम, संदीप बोडवे, नितीन आचरेकर, संग्राम कासले, झुंझार पेडणेकर, आप्पा मालंडकर, उदय बापर्डेकर, पी.के. चौकेकर, सुधीर पडेलकर, गणेश गावकर, समीर म्हाडगुत, केशव भोगले, महेंद्र पराडकर, राजेश पारधी, शैलेश मसुरकर आदी उपस्थित होते. शेवटी कृष्णा ढोलम यांनी आभार मानले.

अभिप्राय द्या..