दोडामार्ग नगरपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे मुक्या जनावरांच्या जीवावर बेततय..

दोडामार्ग नगरपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे मुक्या जनावरांच्या जीवावर बेततय..

 

दोडामार्ग /-

 

कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या स्थापनेपासून कोंडवाडा हा विषय चर्चेत होता यासाठी अनेक आंदोलने झाली, काही दिवस सुरू करण्यात आलेला कोंडवाडा थोड्या दिवसांनी बंद झाला, मात्र मोकाट गुरे स्त्यावर अजूनही फिरताहेत यातच अनेक लहान मोठे अपघातही झाले. मात्र आज दोडामार्ग चौकात भर दुपारी एका वासरालाअज्ञात वाहनाने ठोकरल्याने एक वासरू जायबंदी झाले. हीच वेळ माणसावर आली असती तर असा काळीज चर्र करणारा प्रश्न त्याठिकाणच्या उपस्थित नागरिकांच्या मनातुन व्यक्त होत होता. नागरिकांच्या असलेल्या कोंडवाड्याच्या मागणीला आज पर्यंत नगरपंचायत प्रशासनाने केराची टोपली दाखवली, मोकाट गुरांसंबंधी नागरिकांनी योग्य बंदोबस्त न केल्यास कारवाईची भीतीही दाखवली मात्र अजूनही त्यावर अंमल बजावणी झाली नाही, यामुळे मोकाट गुरांचा प्रश्न नगरपंचायत क्षेत्रात जटिल बनला. आज एका अवजड वाहनाने वासराला धडक दिल्याने ते भर चौकात (पिंपलेश्वर हॉल जवळ) जायबंदी झाले, तेथील ग्रामस्थानी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे मागचे दोन पाय जायबंदी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यावेळी नगरसेविका आदिती मणेरीकर यांनी त्या वासराला पाणी पाजले व इतर ग्रामस्थ व व्यापर्यानी त्या वासराला रस्त्यातून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही कोंडवाड्याची मागणी आज पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

अभिप्राय द्या..