सिंधुदुर्गनगरी /-

माध्यमिक शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे नष्ट करणारा आदेश शासनाने काढल्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय आंदोलना निमित्त जिल्ह्यातील शंभर टक्के शाळा बंद ठेवून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शासकीय आदेशाची होळी करून शासनाचा जाहीर निषेध नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे आंदोलन छेडले असून जिल्ह्यात शंभर टक्के शाळा कडकडीत बंद असल्याचे अनिल राणे कोल्हापूर विभाग सचिव महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांनी सांगितले. ११ डिसेंबर २०२० रोजी माध्यमिक शाळातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची राज्यातील ५० हजार पदे नष्ट करून शासनाने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यावर मोठा अन्याय केला आहे हा आदेश रद्द करण्यासाठी राज्य शैक्षणिक संस्था व महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे आज राज्यभर शाळा बंद आंदोलन करण्यात आले. जिल्हा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग नगरी येथे सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे ११ डिसेंबर च्या शासन निर्णय विरुद्ध जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले या आंदोलनामध्ये ११ डिसेंबर चा आकृतीबंध रद्द झालाच पाहिजे, शिक्षकेतर संघटनेचा विजय असो, शासनाचा निषेध असो, अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी संस्था, पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी शासनाने आकृतिबंध जाहीर केला आहे.शासन निर्णयानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर संवर्गातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पद निश्चिती मानधनावरील नेमणुका याबाबतचा आकृतीबंध निर्णय निर्गमित करण्याचा शासनाने प्रयत्न केलेला आहे खासगी व्यवस्थापनाच्या शाळातील कर्मचारी यांच्या नेमणुका महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली च्या तरतुदीनुसार व्यवस्थापनाकडे आहेतच. परंतु त्याचे सेवा हक्क अबाधित ठेवणे बाबत ची जबाबदारी नियमातील तरतुदीनुसार पदांच्या संरक्षणाची कर्तव्य संघटना माध्यमातून मांडण्याचे हक्क संघटनेकडे आहेत शासन निर्णयानुसार चतुर्थश्रेणी कर्मचारी पदाबाबत अन्यायकारक निर्णय घेऊन भविष्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदे संपुष्टात आणून मानधनावर नेमणुका करणे बाबत कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाने केलेले आहेत याबाबत राज्यभरातून राज्य शैक्षणिक संस्थाचालक व महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटना तीव्र व्यक्त करत आहेत. संस्था चालक संघटनेच्या तसेच महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार आमच्या संघटनेचे सभासद सुद्धा बंद आंदोलनात सहभागी झालेले आहेत. शासनाने ११ डिसेंबर २०२० चा शासन निर्णय रद्द न केल्यास ०१ जानेवारी २०२१ पासून संपूर्ण राज्यातील शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय संस्था चालक संघटनांनी घेतलेला आहे संस्थाचालक संघटनेने घेतलेल्या निर्णयाला जाहीर पाठिंबा आणि जाहीर सहभाग घेऊन महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेने पाठिंबा देऊन सहभागी झालेले आहेत आज संपूर्ण राज्यभर एक दिवस हे आंदोलन होत असून सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने सहभागी होऊन आपला तीव्र विरोध दाखवून शासनाचा निषेध नोंदवून शासकीय निर्णयाची होळी करून एक दिवशीयआंदोलन १००% यशस्वी केले आहे या आंदोलनामध्ये विविध संघटनांनी पाठिंबा दिला असून यावेळी अनिल राणे कोल्हापूर विभाग सचिव महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर संघटना, गजानन नानचे सचिव सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर संघटना, धनश्री गावडे जिल्हा उपाध्यक्ष, सुनील नाईक माजी सचिव, दिनेश फोंडेकर अध्यक्ष वैभववाडी तालुका, पांडुरंग दळवी सल्लागार जिल्हा संघटना, लाडू जाधव सहखजिनदार जिल्हा संघटना, शाबी तुळसकर दोडामार्ग तालुका अध्यक्ष, कृष्णा लोंढे सल्लागार, शंकर सावंत जिल्हा मार्गदर्शक, रुपेश खोबरेकर मालवण तालुका अध्यक्ष, मुख्याध्यापक संघटनेचे टी.के. पाटील प्रदीप शिंदे, रावजी यादव कास्ट्राईब संघटना, जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी होऊन शासनाचा निषेध नोंदवला आहे या आंदोलनाचे निवेदन माननीय जिल्हा अधिकारी सिंधुदुर्ग व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना देण्यात आले असून शासनाने ११ डिसेंबर चा काळा जीआर काळा आदेश रद्द न केल्यास ०१ जानेवारी २०२१ पासून जिल्ह्यातील व राज्यातील शाळा १००% बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा संस्थाचालक संघटनेने दिला असल्याचे अनिल राणे गजानन नानचे व धनश्री गावडे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page