कुडाळ तालुक्यातील कुंदे येथे ग्रामस्थांचा वतीने तसेच युवक मित्रमंडळाच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गेली तीन वर्षे सातत्याने लोकसहभागातून युवक मित्र मंडळाच्या वतीने पुढाकार घेत  कुंदे गाव स्वच्छता अभियान राबवत आहे. कसाल ते कुंदे जिल्हा परिषद मुख्य रस्ता तसेच उर्वरित झाडे झुडपे साफ करण्यात आली.

गेल्या वर्षी जिल्हा परिषद विभागीय मतदारसंघात कुंदे गावाने स्वच्छता अभियानाचा पुरस्कार प्राप्त केला आहे. तसेच संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान याकरिता हे गाव पुरस्कारासाठी वाटचाल करीत आहे. या गावात कृषी विज्ञान केंद्र, भगीरथ प्रतिष्ठान, लुपिन फाउंडेशन यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांच्या योजनेची वाटचाल चांगल्या प्रमाणे सुरुवात आहे. लोकसहभाग मिळत असल्याने महिला बचत गट युवक मंडळे शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत. गावच्या एकजुटीने चांगले काम करत महाराष्ट्र शासनाचा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार आम्ही मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.असे कुंदे सरपंच सचिन कदम यांनी सांगितले.

यावेळी उपसरपंच सुशील परब, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश परब, आदीसह ९ वाड्यांचे ग्रामस्थ युवक मित्रमंडळ महिला व बचत गट, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page