चौके गावातील जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांचा उस्पूर्त प्रतिसाद..

चौके गावातील जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांचा उस्पूर्त प्रतिसाद..

मालवण /-

चौके गावातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह मिळून आल्याने प्रथमच गावात कोरोनाचा शिरकाव झाला त्यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक घेउन दक्षता म्हणून गुरुवार दि. २४ सप्टेंबर ते गुरुवार दि. १ ऑक्टोबर या आठ दिवसांसाठी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे

चौके गाव आजपर्यंत कोरोनामुक्त गाव राहिले होते. ग्रामपंचायत पातळीवर केलेल्या उपाययोजना आणि निर्णयामुळे आजपर्यंत कोरोनामुक्त राहिलेल्या या गावातील ओरोसमध्ये कामाला असलेला एक प्रशासकीय अधिकारी मंगळवारी कोरोनाबाधित मिळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर श्री. भराडी मंदिरात ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सदरील रुग्ण बाजारपेठेपासून जवळच मिळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आठ दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता

अभिप्राय द्या..