सिंधुदुर्गसाठी तातडीने 500 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध-आ.वैभव नाईक

सिंधुदुर्गसाठी तातडीने 500 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध-आ.वैभव नाईक

सिंधुदुर्ग /-

कोविड १९च्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन हे अत्यंत
महत्वाचे ठरत आहे. कोरोनाचा गंभीर रुग्ण यातून बाहेर येण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यास
चांगल्याप्रकारे फायदा होत आहे. मात्र, सध्या या इंजेक्शन्सचा तुटवडा जाणवत आहे. सिंधुदुर्गसाठी १५०० रेमडेसिवीर इंजेक्शन्सची परचेस ऑर्डर पाठविण्यात आली होती. इंजेक्शन्स उपलब्ध होण्यास विलंब
लागत असल्याचे लक्षात येताच,आमदार वैभव नाईक यांनी मुंबईला जाऊन आरोग्य संचालक डॉ. साधना
तायडे यांची भेट घेऊन इंजेक्शन उपलब्धतेसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यानुसार तातडीने ५०० इंजेक्शन्स बुधवारी सिंधुदुर्गसाठी मुंबईहून पाठविण्यात आली आहेत. गंभीर कोरोनाग्रस्त रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन उपयुक्त ठरते. याबाबत ठरवून देण्यात आलेल्या
मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णांना ही इंजेक्शन देण्यात येतात.

त्यानुसार गंभीर असलेल्या एका रुग्णांला ६ इंजेक्शन्स देण्यात येतात. मात्र, राज्यभरातच सध्या रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा मोठा तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यासाठी आतापर्यंत स्वत: खरेदी करण्यात आलेली १४७ व रत्नागिरीहून उपलब्ध झालेली १५० एवढीच इंजेक्शन्स मिळाली होती.

*उपयुक्त इंजेक्शन*
सद्यस्थितीतजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गंभीर रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन हे अत्यंत उपयुक्त आहे.शल्य चिकीत्सकांकडून प्राप्त १५०० इंजेक्शन्सची खरेदी ऑर्डर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पाठवून यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. मात्र, राज्यभर सर्वत्रच या इंजेक्शन्सची वाढती मागणी असल्याने
इंजेक्शन्स उपलब्ध होण्यास विलंब होत होता. ही बाब लक्षात येताच आमदार वैभव नाईक यांनी थेट मुंबई गाठत
आरोग्य संचालक डॉ.साधना तायडे यांचे भेट घेऊन तातडीने ५०० इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्यासाठी आग्रह धरला.
त्यानंतर डॉ. तायडे यांनी सीप्ला कंपनीशी बोलून सिंधुदुर्गसाठी ५०० इंजेक्शन्स उपलब्ध करण्यासाठीची
कार्यवाही केली. त्यानुसार पुढील कार्यवाही होऊन ही इंजेक्शन्स बुधवारी सायंकाळी मुंबईहून पाठविण्यात आली.

*लवकरच मिळणार.*

इंजेक्शन्स उपलब्ध झाल्याबाबत आम्हाला कळविण्यात आले असून गुरुवारपर्यंत ही इंजेक्शन्स सिंधुदुर्गात
येतील, असे जिल्हा रुग्णालयाच्या सुत्रांकडूनही सांगण्यात आले.दरम्यान, मागणीतील उर्वरित १ हजार इंजेक्शन्सही लवकरात लवकर उपलब्धतेसाठी आपला प्रयत्न
असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..