सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य जनतेला होणारा मनःस्ताप कमी करण्यासाठी सरचिटणीस माजी आमदार जीजी उपरकर यांच्या संकल्पनेतून कोरोना मार्गदर्शन तक्रार निवारण केंद्र सिंधुदुर्ग मनसेच्या वतीने जिल्हा रुग्णालय समोर करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोना आपत्ती प्रादुर्भाव चालू झाल्यापासून कोरोना रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभार बेजबाबदारपणा याच्यामुळे नाहक मनस्ताप होत असल्याबाबत अनेक तक्रारी विविध वृत्तपत्र प्रसारमाध्यम व रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात करुणा रुग्णांची परवड होत असून त्यांचे कडे हे सांग होत असल्याची धारणा जिल्ह्यातील जनतेचे झालेली होती मनसेच्या माध्यमातून त्यांना धीर देण्याच्या दृष्टीने व या आपत्ती कार्यकाळ प्रादुर्भावित उचित मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी मनसेने हा अभिनव उपक्रम चालू केला आहे जिल्ह्यातील जनतेने या आपत्ती कार्यकाळात घाबरून न जाता धैर्याने सामना करण्याच्या दृष्टीने मनसेच्यावतीने सहकार्य करण्याचे नाही सरचिटणीस उपरकर यांनी यावेळी दिली तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांनी सर्वसामान्य जनतेकडे पाठ फिरवल्याचे चित्र असताना मनसे हा एकमेव पक्ष आहे जो या संचारबंदी कार्य काळापासून प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून जनतेला मदत करत आहे.

सिंधुदुर्ग मनसेचे कोरोना मदत केंद्राचे उपरकर यांचे हस्ते झाले उदघाटन प्रसंगी ओरोस जिल्हा रुग्णालय समोर मनसेचे जनता मदत केंद्र कार्यान्वित.उपस्थिती- कुणाल किनळेेकर मनविसे जिल्हाध्यक्ष,राजन दाभोलकर ( जिल्हाध्यक्ष),दया मेस्त्री उपजिल्हाध्यक्ष, प्रसाद गावडे तालुकाध्यक्ष कुडाळ,अमित इब्राहमपूरकर,राजेश टंगसाळी,आपा मांजरेकर,बाबल गावडे,दिपक गावडे,विल्सन गिरकर,सचिन ठाकूर,अविनाश अणावकरअणावकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page