सिंधुदुर्ग /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्राद्र्भाव नियंत्रित करण्यासाठी उपलब्ध पर्यायांची कमतरता असुन हे मनुष्यबळ तथा यंत्रणा वाढवणे तसेच ठोस कृती आराखडा बनविणे आवश्यक झालेले आहे. यासाठी आज सोमवार २१ सप्टेंबर रोजी सायं. ४ वाजता आरोग्याशी संबंधीत सर्वसंघटना यांची एकत्रित बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.अशी माहिती आधार फाउंडेशन चे सचिव नंदन वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचनेनुसार आज ओरोस येथे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थित ही बैठक होत आहे. या बैठकीला डीएफसी-सिंधुदुर्ग,आय.एम.ए.- सिंधुदुर्ग, अस्तित्व परिषद- सिंधुदुर्ग, होमिओपॅथि संघटना-सिंधुदुर्ग, मॅग्मो संगठना-सिंधुदुर्ग, गॅमो संगठना-सिंधुदुर्ग, जिल्हा परिषद आरोग्यसेवा संगठना- सिंधुदुर्ग, नर्सेस संगठना-सिंधुदुर्ग, (NHM) राय/के महासंघ संगठना- सिंधुदुर्ग, जिल्हा मलेरिआ आरोग्य सेवा संगठना सिंधुदुर्ग, जिल्हा औषध निर्माण अधिकारी संगठना सिंधुदुर्ग, आशा व गटप्रवर्तक संगठना सिंधुदुर्ग, कास्ट्राईब संघटना-सिंधुदुर्ग व आधार फाउंडेशन- सिंधुदुर्ग, या संघटना सहभागी होणार आहेत.तसेच DHO, CS, CEO आणि टास्क फोर्स समिती, होमिओपॅथिक कॉलेज प्राचार्य,आयुर्वेदिक कॉलेज प्राचार्य असणार आहेत.