कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज रविवार ३८ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात १० रुग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यात आतापर्यंत ६५४ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज रविवार ३८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून कुडाळ १०, गुढीपूर ५, माणगांव १, ओरोस ६, कसाल १, घावनाळे ५, साईगांव १, वर्दे १, पिंगुळी २, वेताळ बांबर्डे १, कुटगांव १, मुळदे १, असे रुग्ण आढळून आले आहेत.तसेच तालुक्यात २३२ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १५२ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ८० कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page