वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यात आज ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण २७५ पॉझिटिव्ह रुग्णापैकी १७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.

आज सोमवारी आलेल्या अहवालात,म्हापण येथे २ नवीन कोरोना पॉझिटिव्ह,वेंगुर्ले शहर येथे २ व्यक्ती पॉझिटिव्ह संपर्कातील, रेडी कनयाळ येथे १ व्यक्ती व रेडी बोंडोजीवाडी येथे २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.आतापर्यंत तालुक्यात २७५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या असून १७० कोरोनामुक्त झाले असून ९९ व्यक्ती उपचार घेत आहेत व ६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे”प्राथमिक आरोग्य केंद्र परुळे अंतर्गत ३४ रुग्ण – बरे झालेले १७.आडेली पीएचसी अंतर्गत पॉझिटिव्ह १९ – ६ कोरोनामुक्त. तुळस पीएचसी अंतर्गत ४८ रुग्ण – बरे झालेले ३८. रेडी पीएचसी अंतर्गत ६४ रुग्ण – बरे झालेले ३४,वेंगुर्ले शहर एकूण आढळलेले पॉझिटिव्ह ११० – बरे झालेले रुग्ण ७५,उपचाराखाली ३३ व
मृत्यू २.ग्रामीण एरियात एकूण आढळलेले पॉझिटिव्ह रुग्ण १६५- बरे झालेले ९५,उपचाराखाली ६६ व मृत्यू ४.अशा प्रकारे वेंगुर्ले तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page