वैभववाडी / –
वैभववाडी तालुक्यात आता पर्यंत 106 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 17 रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर सांगूळवाडी येथील कोविड सेंटर येथे उपचार सुरू आहेत.आता पर्यंत 89 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.गेले 5 दिवसात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कात 23 व्यक्ती आल्या होत्या ,त्या सर्वांचे स्वब घेतले होते.गेले 5 दिवस स्वब आलेले नव्हते.त्यामुळे संशयित व त्यांचे नातेवाईक तणावाखाली होते.सोमवारी संध्याकाळी 23 व्यक्तीचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे सर्वानी सुटकेचा श्वास सोडला.तालुक्यात रुग्णांचा आकडा शंभरी पार झाला आहे. तालुक्यात आता पर्यंत 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे. मृत झालेल्या रुग्णांमध्ये वैभववाडी,कोकिसरे व तिथवली गावातील रुग्णांचा समावेश आहे.
वैभववाडी तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे.गेले 5 दिवसात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही.आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी संपूर्ण तालुक्यात घरोघरी जाऊन कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून जनजागृती केली जात आहे.सर्वानी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे,मास्कचा वापर करावा,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे,सॅनिटायझरचा वापर करावा असे जनतेला आरोग्य यंत्रणेकडून आवाहन करण्यात आले आहे.