सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1 हजार 916 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 105 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 48 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
अ.क्र विषय संख्या
प्रयोगशाळा अहवाल
1 एकूण अहवाल 22,855
2 पॉजिटीव्ह आलेले अहवाल 3,085
3 निगेटीव्ह आलेले अहवाल 19,017
4 प्रतिक्षेतील अहवाल 753
5 सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 1,105
6 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 64
7 डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण 1,916
अलगीकरण व जिल्ह्यात प्रवेश केलेल्यांची माहिती
8 गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील एकूण व्यक्ती 8,147
9 नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12,778
00000
मालवण तालुक्यात 5 ठिकाणी कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.21 : मालवण तालुक्यात 5 ठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत. सदर कंटेन्मेंट झोन पुढील प्रमाणे आहेत. कुणकवळे, नागझर येथे दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत, वायरी- भुतनाथ, वराडकरवाडी येथे दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत, पिंपळफोंड, मेढा, मालवण येथे 1 ऑक्टोबर पर्यंत, सोमवार पेठ, मालवण येथे 2 ऑक्टोबर पर्यंत, भरड मालवण, मथुरा कॉम्पलेक्स येथे 2 ऑक्टोबर पर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दिनांकापर्यंत सर्व अस्थपना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच नागरिकांच्या येण्या-जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. सदर आदेश अत्यावश्यक सेवा जसे सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था इ. वितरीत करणारे, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना लागू असणार नाहीत. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 व 58, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 71,139 आणि भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page