कुडाळ /-

नेरुर माड्याचीवाडी येथील अपंग निराधार वृध्द दांपत्य श्री महादेव गावडे व सौ पार्वती महादेव गावडे यांना रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या वतीने युरीन पाॅट, वाॅकर, कमोड चेअर आदी साहित्य देऊन आधार देण्यात आला यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे अध्यक्ष श्री सचिन मदने, सेक्रेटरी श्री अभिषेक माने, ट्रेझरर श्री अमित वळंजू, सदस्य श्री राकेश म्हाडदळकर, नेरूर माड्याचीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री सुभाष परब, सुभाष गावडे, एकनाथ गावडे, वरचीवाडी मित्रमंडळाचे सदस्य दिपक गावडे, अक्षय तरफे, सिताराम मुळीक आदी उपस्थित होते.

गेली अनेक वर्षे नेरूर माड्याचीडी वरचीवाडी येथे श्री महादेव सहदेव गावडे व सौ पार्वती महादेव गावडे हे निराधार अपंग वृध्द दांपत्य राहत आहे. सौ पार्वती गावडे या 70% अपंग असून श्री महादेव गावडे यांना जन्मतःच एक पाय पोलिओग्रस्त असून मधुमेहामुळे दुसरा पाय गेल्या आठवड्यात काढावा लागला त्यामुळे या वृध्द दांपत्याला युरीन पाॅट, कमोड चेअर, वाॅकरची आवश्यकता असल्याचे नेरूर माड्याचीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा हाॅटेल ला माफियाचे मालक श्री सुभाष परब यांनी रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या पदाधिका-यांशी संपर्क साधला असता तात्काळ रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या वतीने आज नेरूर माड्याचीवाडी येथे सदर साहित्य देऊन निराधार वृध्द गावडे दांपत्याला आधार देण्याचा उपक्रम राबविला.

या उपक्रमाबाबत नेरूर माड्याचीवाडी वरचीवाडी मित्रमंडळाने रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे आभार मानले. या उपक्रमासाठी जनकल्याण संस्थेचे सदस्य श्री महेश कुडाळकर, श्री श्रीधर गोरे, रोटरीचे सदस्य डॉ योगेश नवांगुळ यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page