सिंधुदुर्ग /-

कोरोना महामारी च्या काळात कोरोना झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात येणेही हाय रिक्स मानले जाते.मात्र अशा रुग्णांना सेवा देणे एक वेगळा अनुभव मानला जाईल.एका भयानक आजाराच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णांना केवळ सेवाच नाही तर त्यांचे आत्मबल वाढवण्याचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मधील नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या पाच विद्यार्थिनी करत आहेत.आपल्या करिअरची सुरुवात चांगली व्हावी अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते मात्र या पाचही विद्यार्थिनींनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील सेवेची सुरुवात कोरोना रुग्णांवरील सेवेने केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्थ अभिमान वाटावा अशा कु.चैताली राजेंद्र राणे,कु.काेमल विलास सावंत, कु.रुचिता राजेंद्र धुरी,कु.भाग्यश्री मनाेहर खवणेकर, कु.रूपाली मंगेश रूपये या पाच विद्यार्थिनी सद्यस्थितीत सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ कोल्हापुर येथील कोरोना सेंटरमध्ये सामाजिकतेचा वसा जोपासत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. शैक्षणिक वर्ष पूर्ण झालं पण परीक्षा न झाल्याने प्रत्यक्ष वैद्यकीय सेवेत नोकरी मिळत नव्हती त्यामुळे कुडाळ मुळगाव रेडी येथील कुमारी चैताली राजेंद्र राणे, कुमारी ऋचिता राजेंद्र धुरी साळगांव, भाग्यश्री मनोहर खवणेकर आंदुर्ले, कोमल विलास सावंत बिबवणे, रुपाली मंगेश रुपये पोयरे या पाचही विद्यार्थिनींना त्यामुळे आपला रिकामी वेळ कसा घालवावा? तो कोणत्या तरी योग्य कारणासाठी वापरला जावा, ज्या विषयाचे आपण शिक्षण घेतले आहे त्या आरोग्य क्षेत्रातच काम करण्याची ईच्छा या पाचही विद्यार्थ्यांनींची होती. या अनुषंगाने कुमारी चैताली राणे हिने काही हॉस्पिटलशी थेट संपर्क करून आपली रुग्णसेवेची इच्छा व्यक्त केली. यामध्ये कोल्हापूर येथील सिद्धगिरी हॉस्पिटल अँण्ड रिसर्च सेंटर कणेरी मठ कोल्हापूरशी तिचा संपर्क झाला.

नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्या कुडाळ येथील बॅं.नाथ पै महाविद्यालयाचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्याशी संपर्क करून त्यांनी आपला हा मनोदय व्यक्त केला. त्यांनीही याला पुर्णतःपाठिंबा दर्शवला. यानंतर तिच्यासह या पाच विद्यार्थिनी या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी कार्यरत झाल्या. दरम्यानच्या कालावधीत या ठिकाणी कोरोना वरील रुग्णांच्या उपचारासाठी कोरोना रिसर्च सेंटर सुरू झाले. सद्यस्थितीत स्थितीत कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. अशा स्थितीत अशा रुग्णांच्या संपर्कातही कोण येत नाहीत. मात्र अशा रुग्णांवर उपचार करून त्यांना सेवा देणे म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजण्याचाच प्रकार आहे. कोणत्याही स्थितीत न डगमगता त्यांनी कोरोना सेंटरमध्ये ड्युटी स्वीकारली. या सेंटरमध्ये सेवा देणाऱ्यांना सहा तासाची ड्युटी असते. या रिसर्च सेंटरमधील सर्व अधिकारी यांनी या कालावधीत या कर्मचाऱ्यांची सर्व प्रकारची काळजी घेतली आहे. तशी यंत्रणा ही या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे. सर्वसामान्य रुग्णांना सर्वच सेवा देतात. पण कोरोना रुग्णांना सेवा देणे हे सामान्य काम नाही.हे इंद्रधनुष्य सिंधुदुर्ग मधील या पाचही मुलींनी अगदी लिलया पेलले आहे.आजार कोणताही असो पण अशा वेळी रुग्णाला गरज असते ती मानसिक आधाराची व त्यांचे मनोबल वाढवण्याची. यात कोरोना रुग्ण म्हणजे सर्वप्रथम स्वतःचे मनोबल वाढवून त्यांच्या सेवेत रुजू होणे हे तेवढे सोपे काम नाही. मात्र या पाच विद्यार्थिनी कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना सेवा देत कोरोना योद्धा असल्याचे आपल्या धैर्यातून सिद्ध केले आहे.

कोरोना बाबतची असलेली सर्व भीती बाजूला ठेवत सिंधुदुर्ग मधील या पाच विद्यार्थिनी परजिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या सेवेत कार्यतत्पर आहेत.या पाच विद्यार्थिनींच्या या कार्यकर्तृत्वाने नर्सिंग क्षेत्रातील सर्वच विद्यार्थ्यांनीं समोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. मळलेल्या व रुळलेल्या वाटेवरून सर्वच प्रवास करतात पण स्वतःचा एक वेगळा मार्ग तयार करणे अवघड काम असते. कोरोना महामारीच्या या अवघड काळात या पाच विद्यार्थ्यांनींनी आपले एक वेगळे असे कार्यकर्तृत्व सिद्ध केले आहे.

यातील चैताली राणे जे.जें.मेडीकल मुंबई व प्रिन्स अलीखान यासारख्या रुग्णालयामध्ये इंटरन्स मधे कॅन्सर सारख्या रुग्णांना ही सेवा दिली आहे. कॅन्सर सारख्या रुग्णांच्या सहवासातही राहणे हे तसे फार कठीण काम असते.त्यामुळे काहीवेळा या कॅन्सर रुग्णांचे नातेवाईकही उपचारादम्यान रुग्णांकडे पाठ फिरवतात. अशावेळी या रुग्णांना आधार असतो तो रुग्णालयातील सेवा देणाऱ्यांचाच.अशाप्रकारचे रुग्ण चांगले होऊन घरी जातात तेव्हा ते याठिकाणी माणुसकीच्या नात्याने रुग्णसेवा देणाऱ्यांना आशीर्वाद देतात आपल्यासाठी रुग्णांचे हेच आशीर्वाद अतिशय महत्त्वाचे आहेत असे कुडाळ येथील चैताली राणे ही आवर्जून सांगते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page