वेंगुर्लेचे माजी उपनगराध्यक्ष विक्रम गावडे यांचे निधन..

वेंगुर्लेचे माजी उपनगराध्यक्ष विक्रम गावडे यांचे निधन..

वे

वेंगुर्ले /-

वेंगुर्ले शहर कँम्प डाँन्टस काँलनी नजीकचे रहिवासी व वेंगुर्लेचे माजी उपनगराध्यक्ष विक्रम ऊर्फ विकी विजय गावडे (50) यांचे आज शुक्रवार दि. 23 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता कुडाळ येथील एका खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.वेंगुर्ले येथील बँ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात ते लिपिक पदावर कार्यरत होते. हरहुन्नरी व्यक्तीमत्व असलेले विकी गावडे हे सामाजिक उपक्रम राबवून गोरगरीब नागरिकांना त्याचा लाभ देत असत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 1 मुलगा असा परीवार आहे.वेंगुर्लेच्या माजी नगरसेविका गिता गावडे व माजी उपनगराध्यक्ष कै. विजय गावडे यांचा तो मुलगा होय. त्यांच्या अकस्मित निधनाबद्दल शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

अभिप्राय द्या..