कणकवली /-
कणकवली शहरातील कांबळे गल्ली येथील रहिवासी त्रिलोक दत्तात्रय सोळसकर ( वय ७० ) यांचे आज सकाळी निधन झाले. तर काल (ता. २२) सायंकाळी त्यांचे जावई राजेश धुरी यांचे निधन झाले. दोहोंवरही ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. राजेश धुरी (वय ४२) यांचे काल (ता. २२) सायंकाळी ओरोस येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले होते. हा धक्का त्रिलोक सोळसकर त्यांना पचवता आला नाही. त्यानंतर अवघ्या बारा तासात आज सकाळी त्यांचे निधन झाले. सोळसकर यांच्या पत्नीचेही सहा महिन्यापूर्वी निधन झाले होते. दरम्यान जावई पाठोपाठ सासऱ्याचेही निधन झाल्याने आज शहरात शोककळा पसरली होती. सोळसकर यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातू असा परिवार आहे. त्यांच्यावर कणकवली स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.