वेंगुर्ला /-
भाजपाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील अणसुर ग्रामपंचायत हद्दीत देऊळवाडी येथे निर्जंतुकीकरणाचा शुभारंभ ग्रामस्थांच्या उपस्थित करण्यात आला.अणसुर मधील काल बुधवारी एका व्यक्तीचे कोरोनाने निधन झाल्याने तसेच काही वाड्यांमध्ये कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्याने संपुर्ण अणसुर गावात जंतूनाशक फवारणी करण्याचे गावातील युवक मंडळाने ठरविले. त्यासाठी लागणारे जंतूनाशक हे भाजपामार्फत देण्यात येणार आहे.
आज गुरुवारी अणसुर – देऊळवाडी येथे निर्जंतुकीकरणासाठी गावातील आबालवृद्ध उपस्थित होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी निर्जंतुकीकरणासाठी लागणारे जंतूनाशक भाजपा तर्फे मोफत पुरवीले जाईल,असे सांगितले.
यावेळी तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, ज्येष्ठ देवस्थान मानकरी बाबी गावडे, सामाजिक कार्यकर्ते बीटु गावडे,शक्ती केंद्र प्रमुख गणेश गावडे, बुथप्रमुख वामन गावडे,कैलास गावडे,भास्कर गावडे,विशाल गावडे,महेश गावडे , विकास गावडे, कार्तिक गावडे, विजय गावडे आदी सातेरी कला क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते . भाजपाच्या वतीने गावात जंतूनाशक फवारणी केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.