वेंगुर्ला तालुक्यात नव्याने २३ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला तालुक्यात नव्याने २३ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह संख्येत दिवसागणिक वाढ होत असून नव्याने २३ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिलीय.यामध्ये शहरी भागात ११ व्यक्ती व ग्रामीण भागात १२ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.काल बुधवारी उशिरा आलेल्या अहवालात मोचेमाड २ व शिरोडा २ तसेच आज गुरुवारी आलेल्या अहवालात शहर एरियात राऊळवाडा ४,कलानगर ३,भटवाडी १,बाजारपेठ १,कॅम्प २ आणि ग्रामीण भागामध्ये आरवली १,मातोंड ३,पाल १,उभादांडा ३ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.तालुक्यात ८०९ कोव्हिड पॉझिटिव्हपैकी आतापर्यंत ६०५ व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत.

अभिप्राय द्या..