सिंधुदुर्गनगरी /-
जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ७ हजार ६१९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ८८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान १५ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला,तर जिल्ह्यात आज आणखी २३७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.मृतांमध्ये नेतर्डे-सावंतवाडी येथील ६२ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. किंजवडे-देवगड येथील ४९ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. भिरवंडे-कणकवली येथील ५९ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. कुणकवणे-देवगड येथील ६५ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. होडावडा-वेंगुर्ला येथील ५२ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. कांदळगांव-मालवण येथील ५० वर्षीय पुरुष आहे. त्याला मधुमेहाचा त्रास होता. कलमठ कणकवली येथील ५७ वर्षीय पुरुष आहे. त्याला मधुमेहाचा त्रास होता.. वळिवंडे-देवगड ६६ वर्षीय महिला आहे. तिला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. वेंगुर्ला येथील ५५ वर्षीय महिला आहे. तिला उच्चरक्तदाब व पक्षाघाताचा त्रास आहे. नेरूर-कुडाळ येथील ७८ वर्षीय पुरुष आहे. त्याला मधुमेहाचा त्रास होता. कुडाळ येथील ४७ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. सावंतवाडी येथील ५५ वर्षीय महिला आहे तिला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. गिर्ये-देवगड येथील ७५ वर्षीय महिला आहे. तिला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. नेरुर- कुडाळ येथील ६५ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. माळगांव-मालवण येथील ५५ वर्षीय महिला आहे. तिला मधुमेहाच त्रास होता.