सर्व प्राथमिक शिक्षकांना कोव्हिड प्रतिबंधात्मक लस द्या : अखिल वेंगुर्ला प्राथमिक शिक्षक संघाची गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी..

सर्व प्राथमिक शिक्षकांना कोव्हिड प्रतिबंधात्मक लस द्या : अखिल वेंगुर्ला प्राथमिक शिक्षक संघाची गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी..

वेंगुर्ला /-

कोव्हीड १९ प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या महामारीचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग व राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या आपत्कालीन परिस्थितीत वेंगुर्ले तालुक्यातील प्राथमिक शिक्षक प्रशासनासोबत असून सर्व शिक्षक प्रशासनाला सहकार्य करणार आहेत. प्रशासनावरील ताण लक्षात घेऊन वेंगुर्ले तालुक्यातील आरोग्य विभागाच्या मदतीसाठी प्राथमिक शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे.शिक्षकांच्या सुरक्षिततेचा विचार करता या आपत्कालीन कामगिरीसाठी नियुक्त्या देताना ज्या ४५ वयावरील शिक्षकांनी कोव्हिड प्रतिबंधात्मक लस घेतलेली आहे, अशा शिक्षकांना प्राधान्याने नियुक्त करण्यात यावे. तसेच उर्वरीत सर्वच शिक्षकांना नियुक्त्या देण्याआधी लसीकरण होणे आवश्यक आहे. यासाठी आपले स्तरावरून विशेष प्रयत्न व्हावेत. तसेच अल्प मानधनावर शिक्षण सेवक पदी कार्यरत असलेल्या शिक्षकांना शासनाच्या विमा योजनांचा लाभ मिळत नसल्याने त्यांना कोव्हिड कामगिरीसाठी नियुक्त करण्यात येऊ नये. गंभीर स्वरूपाचे आजार असलेले शिक्षक तसेच ५३ वर्षे वरील वय असलेल्या शिक्षक कर्मचा-यांनाही सदर कामगिरीतून वगळण्यात यावे. अशा मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष एकनाथ जानकर व सचिव सागर कानजी यांनी गटशिक्षणाधिकारी वेंगुर्ले यांना देण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..