वैभववाडी तालुक्यातल्या तीथवली मधील कोरोनाग्रस्त दिगशी भागात जिल्हाधिकाऱ्यांची भेट..

वैभववाडी तालुक्यातल्या तीथवली मधील कोरोनाग्रस्त दिगशी भागात जिल्हाधिकाऱ्यांची भेट..

पोलीस प्रशासनाने केला बंदोबस्त टाईट, गावात केली टेस्ट करण्यासाठी जनजागृती..

सिंधुदुर्ग / –

जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या तीथवली मधील दिगशी भागात कोरोना रुग्नांची संख्या झपट्टाने वाढत आहे. आज सोमवारी या ठिकाणी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी भेट दिली आणि याठिकाणाच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान या ठिकाणी अचानक वाढती कोरोनाची रूगन संख्या रोखण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. तर वैभवाडीचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लॉक डाऊन आणि कंटेन्टमेंट झोनचे उल्लंघन होऊ नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या भागात पोलिसांनी गावातील लोकांना टेस्ट करण्यासाठी जनजागृती देखील केली आहे.

जिल्ह्यात कणकवली नंतर वैभववाडी तालुक्यात कोरोना बाधित रुग्नांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैभववाडी तालुक्यातल्या तीथावली मधील दिगशी भागात कोरोना रुग्नांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी या गावाला भेट दिली. यावेळी कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, वैभववाडीचे तहसीलदार रामदास झळके, पोलिस निरीक्षक अतुल जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल पवार आधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी या ठिकाणच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. विशेष म्हणजे तिथवली येथील दिगशीत काही दिवसांपासून तापसरीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यह रुग्नांची तपासणी केली असता यातील बरेच रूगन हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. अचानकपणे या गावात मोठ्या संख्येने रूगन आढळू लागल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आज या थैकनिओ भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना या भागातील साथ आटोक्यात आणण्यासाठी सूचनाही केल्या आहेत.

वैभववाडी तालुक्यातल्या तीथावली मधील दिगशी भागात पवारवाडी,पाष्टेवाडी,सोलकरवाडी, मोरेवाडी, धुरीवाडी येथे कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंटेंटमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. या ठिकाणी तालुक्याव्हे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कंटेंटमेंट झोनला 1 पोलीस हवालदार, 1 पो. अंमलदार, 5 होमगार्ड, असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी आज गावात कोरोनाबाबत जनजागृती केली. लोकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉक डाउनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांनीच सहकार्य करणे आवश्यक आहे हे लोकांना पटवून दिले. या ठिकाणच्या कंटेंटमेंट झोन मध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तर पोलीस बंदोबस्तासाठी उपस्थित सर्व अंमलदार व होमगार्ड याना N-95 मास्क चे वाटप करण्यात आलेले आहे. गावात शांतता राखली जावी आणि लोकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे यासाठीचे सर्व उपाय पोलीस खात्याकडून अवलंबले गेले आहेत. दरम्यान कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लोकांनी शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने घालून दिलेले नियम पळाले पाहिजेत असे आवाहन तालुक्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..