आचऱा येथे ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडले..

आचऱा येथे ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडले..

आचरा /-

आचरा समुद्र किनारी कासवमित्रांनी संवर्धन केलेल्या घरट्यातून बाहेर आलेल्या आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिल्लांना वनविभाग अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली कासव मित्रांनी समुद्रात सोडले.

आचरा पिरावाडी येथील समुद्र किनाऱ्यावर 2 महिन्यापूर्वी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सापडून आली होती. ही अंडी येथील कासव मित्र कृष्णा धुरी, महादेव जोशी, सुर्यकांत धुरी, जितेंद्र धुरी,शरद धुरी, रामचंद्र कुबल,प्रकाश धुरी, प्रथमेश धुरी आदी कासव मित्रांनी वनविभागाच्या देखरेखीखाली दोन महिन्यांपूर्वी
समुद्र किनारी संरक्षित करुन ठेवण्यात आली होती.सोमवारी सकाळ पासूनच संरक्षित अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्यास सुरुवात झाली होती. सोमवारी सायंकाळी वनरक्षक सारीक फकीर,वनपाल श्रीकृष्ण परीट, वनमजूर अनिल परब,कांदळवन प्रशेत्राच्या मृणालिनी डांगे,नेहा नार्वेकर , पोलीस पाटील विठ्ठल धुरी जगन्नाथ जोशीआदींच्या उपस्थितीत कासव मित्रांनी
ऑलिव्ह रिडले कासवांच्या
पिल्लांना समुद्रात सोडले. यावेळी माजी उपसरपंच अनिल करंजे, आचरा ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, पिल्लांचे संवर्धन करणारे सूर्यकांत धुरी, कृष्णा धुरी यांसह सर्व कासव मित्र उपस्थित होते. या वेळी बोलताना वनरक्षक सारीक फकिर यांनी आचरा ते तोंडली या समुद्र किनारी भागात एकूण १४ठिकाणी कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली होती.यातील आतापर्यंत दहा घरट्यातील पिल्ले कासव मित्रांच्या सहाय्याने समुद्रात सोडण्यात आले असल्याचे सांगितले.निसर्गाच्या संवर्धनासाठी ग्रामस्थांचे मिळणाऱ्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

अभिप्राय द्या..