कुडाळ तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी..

कुडाळ तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी..

कुडाळ तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने रविवारी सायंकाळी अचानक हजेरी लावली. कुडाळ तालुक्यातील कुडाळ शहरातील काही भागात तसेच,बाव,बांबुळी, आकेरी,माणगाव बाँबर्डे, याठिकाणी काही ठिकाणी वादळी वा-र्यासह अचानक दाखल झालेल्या या पावसामुळे सर्वत्र एकच धावपळ उडाली. यामुळे आंबा काजू सारख्या पिकांना मोठा फटका बसणार आहे.गेले दोन दिवसापुर्वी वैभववाडी परिसरात पाऊस पडला होता. यानंतर कुडाळ तालुक्यात हवामानात बदल झाला होता. काही ठिकाणी वार्‍याचा प्रमाणात वाढ झाली होती. तर दुपारच्या वेळी उष्णताही मोठ्या प्रमाणावर जाणवत होती. यामुळे पावसाची शक्यता वर्तवली जात होती. यानंतर रविवारी सायंकाळी अचानक पावसाने सोसाट्याच्या वा-र्यासह हजेरी लावली.तालुक्यात शहरात तुरळक तर पिंगुळी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. या पावसाचा ऊन्हाळ्यातील पिकांना फायदा होणार आहे तर आंबा काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. या पावसामुळे विविध प्रकारच्या किड रोगांचे संक्रमण वाढणार आहे.

अभिप्राय द्या..