सिंधुदुर्गनगरी /-

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांच्या विरोधात विनभंग केल्याची तक्रार एका ४० वर्षीय महिला कंत्राटी कर्मचारिने सिंधूदुर्गनगरी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली आहे. सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला असून अद्याप अटक करण्यात आलेली नाही. ‘त्या’ पीड़ित महिलेने दिलेल्या तक्रारीमध्ये ‘११ डिसेबर २०२० रोजी मीटिंग घेवून मी सांगेन तसे वागायचे. कोणाला मारायला सांगितले की मारायचे. बुंध्यापासून शेंडयापर्यंत माझी ओळख आहे. माझे कोणीही वाकडे करु शकत नाही, असे सांगितले. आपली ड्यूटी त्यांच्या केबिन समोर लागल्यावर ते कोणत्या कोणत्या कारणाने आपला हात हातात धरुन लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत असत. ड्यूटीवर नसताना सुद्धा फोन करीत मला जिल्हा परिषद जवळ भेटायला या, असे सांगत होते. याबाबत त्यांच्या पत्नीला आपण कळविले. यावेळी त्यांनी १२ फेब्रूवारी २०२१ रोजी ओरोस येथील त्यांच्या बंगल्यावर राहायला येणार आहे. त्यावेळी आपण बोलू, असे सांगितले. परंतु, त्या आल्याच नाही. १५ फेब्रूवारी रोजी डॉ चव्हाण यांच्या केबिन बाहेर माझी ड्यूटी लागली होती. या दिवशी दुपारी ४ वाजता त्यांनी बेल वाजवली. काय काम आहे म्हणून विचारायला गेले असता, माझा हात हातात धरुन तू मला फार आवडतेस. मी जो वागतो ते बाहेर कोणाला सांगू नको. सांगितलेस तर नोकरिवरुन काढून टाकण्याची धमकी दिली. परंतु, त्यांच्या वाढत्या अश्लील चाळ्यामुळे ड्यूटीवर जाण्यास भीती वाटत आहे, असे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार सिंधूदुर्गनगरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून घेत डॉ चव्हाण यांच्या विरोधात भादवी कलम ३५४, ३५४ A (1) (I) व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक माहिती देण्यास पोलिस निरीक्षक अविनाश भोसले यानी नकार दिला. या प्रकरणी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते यानी पीड़ित महिलेला आधार देत त्यांनी मदत केली. पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते. परंतु आपण या बाबत गंभीर भूमिका घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सांगितले. बदनाम करण्याचे षडयंत्र:-डॉ चव्हाण शल्य चिकित्सक डॉ चव्हाण यानी सिंधूदुर्गनगरी पोलिस ठाण्यात याबाबत अर्ज दाखल केला आहे. मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. त्यानुसार माझ्या विरोधात आपल्याकडे तक्रार दाखल होणार असल्याचे समजले आहे. परंतु, तक्रारिच्या अनुषंगाने सर्व साक्षीदार व पुरावे याची खात्री करूनच कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page