रात्रीस खेळ चालेच्या ‘माई’ ने साधला विद्यार्थ्यांशी संवाद!

रात्रीस खेळ चालेच्या ‘माई’ ने साधला विद्यार्थ्यांशी संवाद!

मसुरे/-

मालवण तालुक्यातील ओझर विद्यामंदिर येथे रात्रीस खेळ चाले या मालिकेत माई ही
व्यक्तिरेखा साकारलेल्या सौ शकुंतला नरे यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी मोकळा संवाद साधला. यावेळी
संस्था संचालक तथा माजी सभापती उदय परब, शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे, नेपथ्यकार बाळ नरे, मुख्याध्यापक प्रताप खोत, आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी माई फेम सौ शकुंतला नरे यांनी आपल्या जीवनातील किस्से सांगतानाच कशा प्रकारे अध्ययन करावे या बाबतीत मार्गदर्शन केले. माई आपल्या शाळेत आली या आनंदात विद्यार्थ्यांची त्यांच्या सोबत फोटो काढण्यासाठी झुंबड उडाली होती. प्रशालेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन डि. डि. जाधव यांनी तर आभार उदय परब यांनी मानले.

अभिप्राय द्या..