कट्टा येथे शेतीमाल विक्री केंद्राचा शुभारंभ! शेतकऱ्यांचा उत्पादित माल थेट ग्राहकांना मिळणार;सिद्धान्ना म्हेत्रे

कट्टा येथे शेतीमाल विक्री केंद्राचा शुभारंभ! शेतकऱ्यांचा उत्पादित माल थेट ग्राहकांना मिळणार;सिद्धान्ना म्हेत्रे

मालवण /-

शेतक-यांची उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत विक्री करणे, मध्यस्थी कमी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देणे.या उद्देशाने या विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात येत आहे. असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री सिद्धान्ना म्हेत्रे यांनी येथे केले. शासनाच्या आत्मा योजनेच्या
विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत,संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचा शुभारंभ गुरामनगरी- कट्टा येथे मालवण सभापती अजिंक्य पाताडे यांच्या हस्ते नुकताच झाला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीश्री. मेहेत्रे , आत्मा उपसंचालक श्री.घोलप, उपविभागीय कृषी अधिकारी कणकवलीचे श्री.हजारे, गटविकास अधिकारी मालवण श्री.जे.पी.जाधव, तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी तसेच शेतकरी उपस्थित होते. आभार विश्वनाथ गोसावी यांनी मानले.

अभिप्राय द्या..