पिंगुळी शेटकरवाडी येथील आकाश सावंत या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू..

पिंगुळी शेटकरवाडी येथील आकाश सावंत या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू..

कुडाळ /-

पिंगुळी शेटकरवाडी येथील आकाश प्रभाकर सावंत या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. याबाबतची खबर पिंगुळीचे उपसरपंच सागर बाबाजी रणसिंग यांनी पोलीसात दिली. पोलीसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रमोद वालावलकर यांनी शवविच्छेदन केले. शवविच्छेदन केल्या नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत कुडाळ पोलीस तपास करत आहेत. आकाश याच्या पश्चात भाऊ , दोन बहिणी असा परिवार आहे.

अभिप्राय द्या..